उमदीतील आशांना तात्काळ साहित्य पुरवू ; रमेश हळके | आशांना थर्मामीटरचे वाटप

0
21



उमदी,वार्ताहर : कोरोना योध्दा उमदीतील आशा वर्कर्संना सर्व साहित्य पुरवू असे आश्वासन उपसंरपच रमेश हळके यांनी केले.उमदी ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आशा वर्कर यांना थर्मामीटरचे वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.





ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये सरपंच सौ. वर्षा शिंदे,उपसंरपच रमेश हळके यांच्या हस्ते आशा वर्कर यांना थर्मामीटर सुपुर्द करण्यात आले.

हळके पुढे म्हणाले,सध्या कोरोना रोकण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर आशा वर्कर्स धोका पत्करून काम करत आहेत.त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्या खऱ्या कोरोना योध्दा आहेत.





यावेळी कॉग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे,उपसरपंच रमेश हळके,ग्रामपंचायत सदस्य, श्रीमती कलावती तोरणे, नारायण ऐवळे, भीमाण्णा कोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी दयानंद शिंदे, आशा वर्कर अंबिका थोरात, सविता होनोर, सुनीता कांबळे, ज्योती माने , महादेवी कोळी व ग्रामपंचायत चे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सरपंच शिंदे यांनी आशा वर्कर यांच्या समस्या जाणून घेतल्या.सध्या आशा वर्कर्स यांना लागणाऱ्यां साहित्याची माहिती यावेळी आशांनी ग्रामपंचायतीला दिली.




उमदी ता.जत ग्रामपंचायतीच्या वतीने आशा वर्कर्संना थर्मामीटरचे वाटप करताना उपसंरपच रमेश हळके.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here