घर फोडून एक लाखाचे दागिणे लंपास

0
8



जत,प्रतिनिधी : शहरातील मंगळवार पेठेतील भागिरथी भीमराव जाधव (वय 35) यांच्या घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रूपये, असा सुमारे एक लाख रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात 

भागिरथी जाधव यांनी फिर्याद दिली आहे. 





    

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जाधव या रात्री जेवण झाल्यावर वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्या होत्या. रात्री चोरट्यांनी दरवाजाची कडी कोयडा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने व रोख पाच हजार रूपये चोरून नेले. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक विजय वीर करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here