जत तालुक्यात आणखीन एक कोरोनाचा बळी

0
6



आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत येथील एका 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मुत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून संरपच आण्णासाहेब कोडग यांना कळविण्यात आली आहे.





जत तालुक्यात कोरोनामुळे मुत्यू होण्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे.तालुक्यात आंवढीत पुन्हा कोरोना बाधित आढळून आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचे हे सांगोला कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. तालुक्यात कोरोनाने 200चा टप्पा पार केला आहे. तालुक्यातील कोरोनाची स्थिती चिंताजक बनली आहे.





दरम्यान कोरोनाने आंवढी एकाचा मुत्यू झाल्याच्या वृत्ताला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दुजोरा दिला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here