जत,प्रतिनिधी : बाज ता.जत येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा नाना गडदे या विवाहितेने दोरीने गळपास लावून आत्महत्या केली होती.विवाहितेच्या भावाने पोलीसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी पती नाना गुंडा गडदे रा.बाज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,
विवाहिता सुरेखा गडदे हिने भाचा विशाल गडदे याला मोटारसायकल दुरूस्तीसाठी पैसे दिल्याच्या कारणावरून संशयित पती नाना गडदे यांने चाचा विशाल व सुरेखा गडदे हिला सोमवारी रात्री शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली होते.तसेच गेल्या आठ महिन्यापासून होणाऱ्या त्रासाला सुरेखा कंटाळली होती.
त्यातून तिने आत्महत्या करते म्हणून सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले.त्यातून सुरेखा गडदे हिने मंगळवार ता.11 ला मध्यरात्री आत्महत्या केली आहे.या आत्महत्येस पती नाना गडदे यांनी प्रवृत्त केल्याचे सुनिल विलास गडदे यांने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सा.पो.निरिक्षक महेश मोहिते करत आहेत.





