शेगावमध्ये एकावर चाकूने हल्ला

0
5



जत,प्रतिनिधी : शेगाव ता.जत येथील एकावर पैसे देणेघेणेच्या कारणावरून  चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना ता.5 ऑगष्ट्र रोजी सायकांळी साडेपाचच्या सुमारास घडली. सतिश सुरेश माने(रा.शेगाव)असे जखमीचे नाव आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन राम बूवा,राहूल राजाराम सांवत,अजय व्हनकटे,अजयचा चुलत भाऊ (नाव माहिती नाही)सर्व जण रा.शेगाव या चौघा जणा विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.








पोलीसांनी दिलेली माहिती अशी,

आरोपी सतिश माने यांचे संशयित दौघे पैसे देणार होते.सतिश सातत्याने त्यांना पैसे मागत होता.अखेर संशयित चौघांनी सतिश माने यांना ता.5 ऑगष्टला सायकांळी शेगाव तळ्याजवळ बोलवून घेत चाकूने गंभीर मारहाण करत जखमी केले आहे.सतिशने उपचारानंतर सोमवार ता.10 रोजी पोलीसात धाव घेतली आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here