उमराणी,वार्ताहर : भारतातील ऐतिहासिक हिंदू भगवा ग्रुप उमराणीच्या वतीने श्रीराम मंदिर भूमिपुजन सोहळा साजरा करण्यात आला.हिंदू सामाजासाठी राम पुज्यनीय आहेत.त्यांच्या भव्यदिव्य मंदिराचा आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपुजन करण्यात आले आहे.त्याचे उमराणीतील हिंदू संघटनानी स्वागत करत,आंंनदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना प्रंशात पुजारी(कुडची)म्हणाले,शेकडो वर्षे ज्यांनी श्रीराम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले,बलिदान दिले.त्यांचे बलिदान आदरपुर्वक स्मरण करण्याचा हा दिवस आहे.आजचा हा ऐतिहासिक दिवस हिंदूसाठी उत्सव म्हणून साजरा केला जात आहे.यावेळी सदाशिव मुत्या तरूण मंडळ,श्री.धानेश्वरी तरूण मंडळ,हिंदू प्रेमी उमराणी संघटनानी स्वागत केले.
उमराणी ता.जत येथे श्रीराम मंदिर भूमिपुजन सोहळा साजरा करण्यात आला.
|
|





