मुंबई : कोरोनामुळे यंदाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. मुख्य म्हणजे यंदाही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर, कोकण विभागाने निकालात टॉपचा नंबर कायम राखला आहे. कोरोनामुळे यंदा दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
यंदा एकूण 15 लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात मुलींचा निकाल 96.91टक्के लागला असून मुलांचा निकाल 93.99 टक्के लागला आहे. तर, विभागवारीनुसार कोकण विभागाचा 98.77 टक्क्यांसह सर्वात जास्त लागला आहे. तर, त्यानंतर कोल्हापूरचा 97.64 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा निकाल लागला आहे. तर, पुण्याचा 97.34 आणि मुंबईचा 96.72 टक्के लागला आहे.