जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यासह जत शहरात 22 जुलैपासून लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असून,पाचव्या दिवशीही 26 जुलै रोजी शहरात सामसूम दिसून आली. दरम्यान गत तीन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1643 पोहचली असून, यापैकी 790 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा वेग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यासह जत शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्येही कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये,राहणार आहेत.
सकाळी 7 ते 10 वाजता या दरम्यान केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या दोन्ही शहरांमध्ये महसूल व पोलीस प्रशासनातर्फे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून,पाचव्या दिवशीही बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दवाखाने व मेडीकलचा अपवाद वगळता उर्वरीत दुकाने बंद असल्याने बाजारपेठ तसेच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यााावरव दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.
शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाची पोलीस पथकाकडून चौकशी केली जात आहे. कुणी विनाकारण फिरताना आढळून आल्यास समज देण्याबरोबरच दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.दरम्यान, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असताना जतेत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते.आतापर्यत 7 जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे.