जत तालुक्यात सोमवारी नवे 6 जण पॉझिटिव्ह | शहरातील एक डॉक्टर,अन्य 2 दोघेजण,मुंचडीतील तिघाचा समावेश

जत,प्रतिनिधी : जत शहरातील बाधित डांळिब व्यापाऱ्यांच्या संपर्कात आलेले दोघे नातेवाईक व एका डॉक्टर,आणि मुंचडी येथील मुंबईहून आलेल्या दोघाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.
गेल्या आठवड्यात शहरातील विजापूर रोडवरील एका डांळिब व्यापाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यांच्या संपर्कात आलेले घरातील दोन व्यक्ती व त्यांच्यावर उपचार केलेल्या शहरातील एका खाजगी डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यांचा दवाखाना निंर्जूतीकरण करण्यासाठी 14 दिवसासाठी बंद ठेवण्यात आला आहे.
त्याचबरोबर मुंचडी येथे मुंबईहून आलेल्या तिघाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात सोमवारी एकाच दिवशी सहा जण कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान बाधिताच्या संपर्कातील लोंकाचा आरोग्य विभागाकडून शोध घेण्यात येत आहे.