जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्यादिवशी जत शहरात शुकशुकाट होता. मेडिकल्स वगळता सर्वच आस्थापने बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर नव्हते. शहरातील प्रमुख चौकात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
कोरोनामुळे जिल्ह्यात गुरुवारपासून आठ दिवस लॉकडाऊन लागू केली आहे. तरीही सकाळच्या टप्प्यात काही प्रमाणात रस्त्यावर नागरिकांची रेलचेल होती. दूध खरेदीसाठी काही नागरिक घराबाहेर पडले होते.विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी अडवून त्यांना पुन्हा घराकडे पाठविले. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रशासकीय कर्मचारी, पोलीसच रस्त्यावर दिसत होते.
लॉकडाऊनमुळे जत शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.रस्त्यावर एकादे दुसरे वाहन जाताना दिसत होते.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.पोलीसांनी शहराच्या चारी सीमावर्ती चेक पोस्ट लावली आहे.कामा व्यतिरिक्त कुणालाही शहरात अथवा शहराबाहेर सोडण्यात येत नव्हते.
दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक गावे सुरू होती.अनेक गावात कोरोनाची भिती नसल्याचे चित्र होते.
जत शहरात दुकाने बंद असल्याने शुकशुकाट होता.