बिळूरमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणांना यश

0
2

जत,प्रतिनिधी : गेल्या पंधवड्यात बिळूर ता.जत मध्ये एका कोरोना बाधित रुग्णामुळे संसर्ग झाल्याने गावातील कोरोना बाधिताची संख्या 50 वर गेली होती.मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने बिळूरला जिल्ह्यातील नवे हॉस्टस्पॉट घोषित करत जिल्हा प्रशासनाने बिळूरवर लक्ष केंद्रित करत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लावली होती.बाधित रुग्णाच्या जवळच्या व लांबच्या संपर्कातील 1135 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते.गावातील कोरोना सदृष्य लक्षणे आढळणारे व 50 वर्षावरील नागरिकांचे स्वाब तपासण्याची मोहिम उघडण्यात आली होती.शिवाय ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या औषध फवारणी स्वच्छता यामुळे कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी करण्यात सर्व यंत्रणांना यश आल्याचे चित्र आहे.बुधवारी बिळूरमधील एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर,बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद कांबळे व त्यांची टिम,पंचायत समिती सदस्य रामाण्णा जिवाण्णावर,संरपच नागनगौंडा पाटील,ग्रामसेवक यांच्या प्रयत्नाला कोरोना रुग्णाची संख्या घटल्याने मोठ्या यश येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here