उमदी,वार्ताहर : उमदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांना गडचिरोली येथे केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल केंद्रीय गृहमंत्रालय यांचेकडून
‘आंतरिक सेवापदक’ देऊन गौरव करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने जाडरबोबलाद येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती
तम्मणगौंडा रवीपाटील यांच्याहस्ते शाल,श्रीफळ,व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी प्रकाश काटे,रामलिंग निवर्गी,चनगोंड सावकर, बजरंग व्हकंळे,रुपेश काटे सर,विठ्ठल पुजारी,सोमनाथ मलाबादी,माडग्याळचे कामाण्णा बंडगर,सचिन वाघमारे,कामदेव कोळेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
उपनिरिक्षक नामदेव दांडगे यांचा सत्कार करण्यात आला.