आंवढीतील कोरोना लढाईत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान ; डॉ.प्रदिप कोडग

0

Rate Card

आवंढी,वार्ताहर  : आवंढी ता.जत येथे येथील कोरोना लढाईत गावातील दैनंदिन व्यवहार,सोशल डिस्टन्सिंग राखत कोरोनाला रोकण्यात जतचे प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसिलदार सचिन पाटील,पो.नि.रामदास शेळके यांनी संभाव्य धोका ओळखुन गावकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.परिणामी कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश मिळाले आहे.या कोरोना योध्दाचे आम्ही कायम ऋुणी आहोत,असे मत माजी उपसंरपच डॉ.प्रदिप कोडग यांनी संकेत टाइम्सशी बोलताना व्यक्त केले.

डॉ.कोडग म्हणाले,पंधरा दिवसापूर्वी मुंबईहुन आलेला एक व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह आढळला होता.त्याचवेळी इतर दोन तरुणही पाँझिटीव्ह आढळले, तसेच त्या बाधिताच्या संपर्कात आलेल्या आणखी एका तरुणालाही कोरोनाची लागण झाली होती, हे चौघेही मुंबई येथून आलेले होतेे.या चौघांच्या संपर्कात गावातील अनेक स्थानिक लोक आल्याची भिती होती.परंतु सुदैवाने संपर्कातील इतर कोणीही पाँझिटीव्ह आढळले नाही. यादरम्यानच्या काळात गावात लाँकडाउन केले,कंटेन्मेंट झोन घोषित करुन त्याठिकाणी योग्य ती काळजी घेणे,यांच्याबरोबरच मंडळ आधिकारी काळे,गावकामगार तलाठी भोसले,शेगाव प्रा.आरोग्य केंद्राच डॉक्टर्स,कर्मचारी आवंढी प्रा.आरोग्य उप केंद्राच्या आरोग्यसेविका जगधने सिस्टर,काळे सिस्टर,आशा वर्कर भारती कोडग, गौतमी तोरणे,आर्चना हेगडे, आंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतीचे कर्मचारी संजय कोडग,युवराज काशीद,समाधान कोडग या सर्वांनी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सँनिटायझरचे वाटप करुन लोकांच्यात जनजागृती करत,आरोग्याची काळजी घेण्याचे अवाहन केले.कोरोनाची साखळी वाढू दिली नाही.आरोग्यसेविका, आशा वर्कर व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांना काम करत असताना काही ठिकाणी अडचणीदेखील आल्या परंतु आशातही न डगमगता आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली,आणि गाव कोरोना मुक्त केले आहे. आज गावात नवीन एकही रुग्ण नाही,तरीदेखील गावकऱ्यांनी सोशल डिस्टसिंग राखणे,सँनिटायझरचा वापर करणे,मास्क लावणे,गर्दी न करणे यासारखे नियम कडकपणे पाळले आहेत.भविष्यातही आशाचप्रकारे काळजी घेण्याचे आवाहनही डॉ.प्रदिप कोडग यांनी केले.यावेळी ग्रा.पं.सदस्य लालासाहेब देशमुख, संजय ऐडगे,सौ.पार्वती कोडग,सौ.रत्नमाला कोडग,सौ.मुगाबाई कोडग, यांनी सर्वांचे अभिनंदन केले

आवंढीतील डॉ.सुधीर नाईक व त्यांचे सहकाऱ्यांची घरोघरी जात कलेली ग्रामस्थांची तपासणी महत्वपूर्ण ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.