जतच्या सिंचन योजनेपासून वचिंत गावांना पाणी देण्याबाबत योग्य निर्णय घेऊ : ना.जयंत पाटील

0
4

जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेतील वंचित गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. लवकरच या भागातील समस्या सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील,अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक द्वारे दिली आहे.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जत पुर्व भागासह तालुक्यातील सिंचन योजनेपासून वंचित गावांना पाणी सोडावे,अशी मागणी जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केली होती.

या बैठकीनंतर जत तालुक्यातील या वचिंत गावांना पाणी कसे सोडता येईल यांसदर्भात पांटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ना.जयंत पाटील,ना विश्वजीत कदम, आ.सांवत यांची बैठक झाली आहे.त्यामुळे वंचित गावांना पाणी सोडण्याबाबत तातडीने उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र पाणी कसे सोडायचे,त्यासाठी नवीन योजना होणार की आहे, त्या म्हैसाळ योजनेतून सोडले जाणार याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.

दरम्यान वर्षोन् वर्ष पाणी टंचाईने ग्रासलेल्या जत तालुक्यातील गावांना यामुळे सिंचन योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगली येथील आढावा बैठकीत आ.विक्रमसिंह सांवत यांनी जतच्या वचिंत गावांची माहीती ना.जयंत पाटील यांना दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here