आवंढीचे संरपच आण्णासाहेब कोडग यांना मारहाण : एकावर गुन्हा दाखल

0
8

जत,प्रतिनिधी : आंवढी ता.जत चे संरपच तथा संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली.याप्रकरणी

मोहन महादेव कोडग यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आंवढीत कोरोनाचे तीन रुग्ण सापडताच ग्रामपंचायतीकडून दक्षता घेत औषध फवारणी करण्यात येत आहे. या औषध फवारणीला विरोध  करत मोहन कोडग यांने फवारणी करणारा ट्रक्टर अडवून ठेवला होता.त्याला औषध फवारणीला विरोध करू नकोस म्हणून संरपच कोडग त्याला सांगत असताना मोहन याने शिवीगाळ करत मारहाण केली.यांची माहिती मिळताच पोलीसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. मारहाण व शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संघटित होऊन कोरोनाला रोकू : आण्णासाहेब कोडगआंवढीत सध्या कोरोनाचा धोका वाढला आहे.कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी नागरिकांनी संघटीत होऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. वादविवाद न पडता प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन संरपच आण्णासाहेब कोडग यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here