सांगली : सांगलीच्या रेव्हेन्यू कॉलनीतील मुंबईहुन आलेल्या कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेली महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर तासगाव तालुक्यातील गव्हाण मध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्याची माहित जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली.दरम्यान रुग्ण संख्या वाढल्याने
खळबळ उडाली आहे.
गव्हाण गावामधील व्यक्ती हा खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे सापडलेल्या कोरोना बाधित महिला रुग्णाच्या गाडीतून गुजरातहून आली आहे.नविन दोन रुग्णामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 13 वर पोहचली आहे.