विजापूर-गुहागर मार्गावरील धोकादायक खड्डा मुजविला

0
7

जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गावरील निगडी फाटा येथे नाला बनलेला डोह पालिकेचे माजी सभापती परशुराम मोरे यांच्या प्रयत्नातून काढून रस्ता खुला करण्यात आला.

शहरातील आरळी कॉर्नर,निगडी चौका दरम्यान असणाऱ्या नाल्याच्या पुलावर गेल्या काही दिवसातील पावस व गटारीतील पाणी साचून  येथे रस्ता दबल्याने मोठा खड्डा पडला होता.त्यात पाणी साचून मार्ग धोकादायक बनला होता.या खड्ड्यात आतापर्यत अनेक दुचाकीचे अपघात झाले होते.गुरूवारी सकाळी एक वयोवृद्ध पडले,काही तरूणांनी त्यांना बचावले होते.असा धोकादायक झालेले रास्ता ठेकेदारांकडून दुरूस्तीला विलंब होत होता.या परिस्थितीची माहिती होताच जतचे स्वच्छता दूत माजी सभापती परशुराम मोरे यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देत जेसीबीद्वारे बाजूचे नाले खुले करून पाणी साठू नये अशी व्यवस्था केली.खड्ड्यात मुरूम करण्यात आला.

जत शहरातील महामार्गावरील खड्डा मुजविण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here