आंसगीत पिसाळलेल्या कुञ्याच्या हल्ल्यात महिला जखमी

0
6

माडग्याळ,वार्ताहर : आंसगी ता.जत येथे पिसाळलेल्या कुञ्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्या.रंजना सज्जन माने वय- 38 असे जखमी महिलेचे नाव आहे.

या परिसरात पिसाळलेल्या कुञ्यानी धुमाकूळ घातला आहे.त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

अधिक माहिती अशी, रंजना माने या घरासमोर बसल्या असताना पिसाळलेल्या कुञ्याने त्यांच्या हल्ला केला.त्याग हातास चावा घेत जखमी केले.त्यांचे पती सज्जन माने यांनी कुञ्याला काठीने हुसकाऊन लावल्याने त्यांची सुटका झाली.त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या हाताला 11 टाके पडले आहेत.दरम्यान सुनिल पुदे यांच्या दोन शेळ्या याच पिसाळलेल्या कुञ्याच्या हल्यात ठार झाल्या.पिसाळलेल्या कुञ्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here