उमदी | एक गाव एक गणपती,उमदीत निरूउत्साह |

0
3

उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथे पोलीसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एक गाव एक गणपती बसविण्यात आला.मात्र अनेक मंडळाच्या कार्यकर्त्याचा यात निरूउत्साह दिसला.काही पोलीस कर्मचारी व बोटावर मोजण्याएवढ्या तरूणाच्या उपस्थितीत मुख्य चौकात हा गणपती बसविण्यात आला.

दुष्काळ व पूर या पार्श्वभूमीवर या भागाला मोठा फटका बसला आहे.त्यामुळे शांतता समितीच्या बैठकीत एक गाव एक गणपती बसविण्याचे आवाहन सा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केले होते.बैठकीत सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेत एकच गणपती बसविण्याचे ठरले होते.त्यामुळे सर्वजण एकत्र येत मोठ्या उत्साहात गणपतीचे आगमनसाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती.मात्र अपेक्षित उत्साह दिसला नाही.पोलीसाचे काही कर्मचारी व दहा पंधरा तरूणांच्या उपस्थितीत  खाजगी गाडीवरून मुर्तीची मिरवणूक काढत गणपती मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

उमदी ता.जत येथे एक गाव एक गणपती शासकीय गणपती ठरला,पोलीसांनी मिरवणूकीने मुर्तीची प्रतिष्ठापणा केली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here