माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ(ता.जत) येथील व्हसपेठ ते उमदी पर्यंत रोड चालू असून माडग्याळ येथे होत असलेल्या दुतर्फा गटारीचे काम अतिंम टप्यात आहे. मात्र गटारीचे काम संथ गतीने होत असल्याने गटारीत सांडपाणी आडून राहत आहेत. त्यात कचरा साठून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे रोगराई पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.व्हसपेठ ते उमदी कर्नाटक सीमेलगत डांबरीकरण रस्ता होत आहे.जवळपास रस्ता पूर्णत्वास येत आहे.माडग्याळ मध्ये अतिक्रमण काढून दुतर्फा गटारीचे काम दोन महिन्यापासून सुरू आहे.हे काम अनेक वेळा निकृष्ठ होत असल्याने बंद पाडले होते.त्यामुळे कामाला विलंब लागत आहे.दोन दिवसांपूर्वी माडग्याळ येथील खडी प्रमाणापेक्षा मोठी वापरु नका,प्रमाण नियमानुसार वापरा म्हणून पुन्हा दोन दिवसापासून काम बंद आहे.यापुर्वीची कामेही अपूर्ण असल्याने गटारीत कचरा,सांडपाणी,प्लॉस्टिक पिशव्या,पावसाचे पाणी,घाणीने तुंबू लागल्याने डासांची झपाट्याने उत्पत्ती होत आहे.त्यामुळे माडग्याळ मध्ये अनेक साथीचे आजार डोकेवर काढत असून गटारी झाकून घ्याव्यात व रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.माडग्याळ ता.जत येथील गटारीत पाणी असल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे.