जत,प्रतिनिधी : जत बसस्थानकातील चोरीचा पोलीसांनी चोवीस तासात छडा लावला.बसस्थानकातील सीसीटिव्हीच्या आधारे शर्ली विद्याधर पवार वय 20,रा.कंळबी ता.मिरज या महिलेला पोलीसांनी ताब्यात घेत खाक्या दाखवताच तिने चोरलेले 1 तोळ्याचे गंठन काढून दिले.
मंगळवारी बसस्थानकातून पांढरेवाडी येथे निघालेल्या जयश्री मायाप्पा मानवर यांचे एक तोळे सोन्याचे गंठण,अडीच हाजार रूपये रोखड असलेली पर्स चोरट्यांनी लंपास केली होती.मानवर यांनी याप्रकरणी पोलीसात तक्रार दिली होती.पोलीसांनी बसस्थानकातील सीसीटिव्हीच्या पाहणीत एक महिला संशास्पद स्थानकात फिरताना दिसत होती.तीला ताब्यात घेत पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवताच तिने चोरलेले गंठण पोलीसांना काढून दिले.मात्र अडीच हाजाराची रोखड तिने खर्च केल्याचे सांगितले.दरम्यान तिला अटक केली असून बसस्थानकातील अन्य चोऱ्याचा तपास लागण्याची शक्यता आहे.
पोलीस हवलदार वहिदा मुजावर,प्रविण पाटील,केरबा चव्हाण,सचिन जंवजाळ यांनी ही कारवाई केली.
संकेत टाइम्स वृत्ताची दखल
जत बसस्थानकात दिवसाढवळ्या चोरट्याचा धुमाकूळ घालत असल्याचे वृत्त दैनिक संकेत टाइम्सने प्रसिद्ध केले होते.त्या वृत्तांची व चोरीच्या घटनाची पोलीसांनी गंभीर दखल घेत स्थानकात बंदोबस्त लावला होता.त्यात चोरटी महिला सापडली.अन्य स्थानिक काही चोरटे स्टँड परिसरात फिरत आहेत.त्यांच्याही मुसक्या लवकरचं आवळू असे पोलीसांनी सांगितले.