उमदी | बेकायदा गुटखा विक्री उंदड | अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांला हप्ते द्या कायमपण विका ? |

0

Rate Card

उमदी,वार्ताहर : महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात येऊन पाच वर्षे झाली आहे. गुटखाबंदी नंतरही जत तालुक्यात सर्रास ठिकाणी राजरोसपणे विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आणि हप्तेखोरीला सोकावलेल्या इतर यंत्रणेमुळे गुटखाबंदी केवळ नावाला राहिली आहे.जत तालुक्याच्या कामगिरीवर असलेल्या अधिकाऱ्यांला हप्ता द्या व कायपण बिनधास्त विका असा फतवा काढल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे. त्यामुळे गटारीवर तयारी केलेले पदार्थही थेट विक्री केले जात आहेत. त्यात गुटखा,तंबाखूजन्य पदार्थाला बंदी आहे.असे जत तालुक्यात वाटत नाही.इतका खुलेआम गुटखा,मावा विकला जात आहे.काही ठिकाणी गुटख्याला पर्याय म्हणून

वाळलेली भुकटी मात्रा त्यालाच सुका मावा वापरण्यात येत आहे. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरवातीला काही काळ गुटखा उत्पादक विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केले आहे. परराज्यातील कर्नाटक राज्यातून जत तालुक्यात गुटखा विक्रीसाठी पाठविला जात आहे. नजीकच्या चडचण, विजापूर भागातून गुटखा आणि भुकटी मावा मोठ्या प्रमाणावर आणून विक्री केली जात आहे. गुटखाबंदी नंतर भुकटी मावा फेमस होताना दिसून येत आहे. भुकटीं मावा वाळवलेल्या सुगंधित तंबाखू आणि सुपारी पासून बनवत असल्याने जास्त दिवस टिकून राहते. त्यामुळे या माव्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यात हप्तेखोरीने पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोस सुरू आहे.तरुणाईमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. शालेय, महाविद्यालय विद्यार्थ़्यामध्ये गुटखा सेवनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. याचा विचार करून पाच वर्षांपूर्वी राज्यात गुटखा बंदी लागू करण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात प्रयत्न झाले, परंतु प्रत्यक्षात जत तालुक्यात वेगळीच परिस्थिती आहे. गुटखा बंदी नावापुरती आहे. खेडया -पाड्यापासून ते जत शहरात गुटखा सहजपणे उपलब्ध होते. गुटखा उत्पादक, बेकायदा वितरक, विक्रेते यांनी गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे. पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील काही अधिकारी.आणि कर्मचा-यांनी गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केल्याचे विदारक चित्र जत तालुक्यात पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.