| जतच्या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क | जुन्या व निष्ठावंतांना संधी द्यावी |

0
1

जत,प्रतिनिधी : येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जत तालुका राष्ट्रवादीने मोठी तयारी केली आहे. जत या जागेवर आमचाच हक्क आहे, त्यामुळे तालुक्यातीलच उमेदवारास संधी द्यावी, अशी मागणी जत तालुका राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

जतची जागा ही परपंरागत राष्ट्रवादी पक्षाची आहे. त्यामुळे आघाडी झाली तरी ही जागा आघाडीस सोडणार नाही. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना तसे कळविले आहे. शिवाय जत मधुन माजी जि.प.सदस्य रमेश पाटील, अँड. चन्नापा होर्तीकर व माजी सभापती सुरेश शिंदे हे तिघे इच्छूक आहेत. यापैंकी कोणालाही पक्षाने उमेदवारी द्यावी. तसेच पक्षनिष्ठ व जुन्या पदाधिकाऱ्यांचा विचार व्हावा, सध्या राज्यात भाजप सरकार विषयी जनतेत संतापाची लाट आहे. लोकांना परिवर्तन हवे आहे. जत तालुका देखील परिवर्तन करण्याच्या भूमिकेत आहे. गेल्या वर्षात पुर्वभागातील 65 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. विकासाची अनेक कामे अपुरी आहेत. अशा स्थितीत जत तालुक्याला या निवडणूकीत सक्षम पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कडे पाहत आहे.कारण स्व.राजारामबापू नंतर जत तालुक्याच्या विकासाला सर्वाधिक निधी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे. आघाडी सरकार राज्यात असताना आमदार जयंत पाटील यांनी मोठा निधी दिला आहे.आमदार जयंत पाटील निधी सोबत जत तालुक्यातील सर्वच बहुजन समाजातील नेतृत्वाला तालुका जिल्हा राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here