जत,प्रतिनिधी : अंकलगी (ता.जत) येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील एका खोलीचे छत कोसळले आहे.सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने जीवितहानी झाली नाही.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकलगी मध्ये सध्या 168 मुले शिक्षण घेत आहेत.सात शिक्षक कार्यरत आहे.मुलांची शाळेच्या पाच खोल्या आहेत.यातील जीर्ण झालेल्या एका खोलीचे पाऊसामुळे रात्री छत कोसळले आहे.याठिकाणी गेली तीन वर्षापासून शाळा भरत नसल्याने आत कोणतीही शैक्षणिक नुकसान झाले नाही.तीन वर्षापासून प्रस्ताव प्रलंबित
या इमारतीचा पंचायत समितीकडे निर्लेखनसाठी पाठविण्यात आला आहे.धोकादायक परिस्थिती असताना देखील शिक्षण विभागाने लक्ष दिलेले नाही.यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.शाळेकडे शिक्षण विभाग याकडे लक्ष देईल का?असे प्रश्न निर्माण झाला आहे.शाळेची जूनी इमारती धोकादायक बनल्याने उर्वरित खोल्या कधी पडतील याचा नेम नाही.धोकादायक इमारतीमुळे शिक्षकांना व्हरांड्यात, झाडाखाली,भर उन्हामध्ये पटांगणात बसवून अध्यापन करावे लागत आहे.याकडे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने लक्ष देऊन नवीन शाळा इमारत द्यावी अशी पालकवर्गातून होत आहे.
जत : अंकलगी (ता.जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचा व्हरांड्यातील छत पडले आहे.