संख | उच्च शिक्षा घेतलेले तरूण परिवर्तन घडवतील | डॉ.अमृत्तानंद महास्वामीजी |

0

संख,वार्ताहर :जत तालुक्यात शिक्षण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. आजही तालुक्यातील अशिक्षित लोक दुर्लक्षित राहत आहेत.त्यामुळे उच्च शिक्षणाबरोबर सर्वोत्तम शिक्षा घ्या,शिकलेले तरूणच जत तालुक्यात परिवर्तन आणतील असे प्रतिपादन पं.पू.डॉ.अमृत्तानंद महास्वामीजी यांनी केले.

संख (ता.जत) येथील आर.के.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अभ्यास केंद्र,संख येथे एम.ए.अभ्यास केंद्र व पदवी प्रमाणपत्र वितरणव सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.

दिव्य सानिध्य लाभलेले गुरुदेवाश्रम,बालगांव,प्रमुख 

प.पू.डॉ.अमृतानंद महास्वामीजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रांरभ करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदचे सभापती ब्रम्हानंद पडोळकर,य.च.म.मु.विद्यापीठ नाशिकचे विभागीय संचालक दादासाहेब मोरेे ,शिक्षण व आरोग्य,सभापती तम्मणगौडा रवि पाटील,अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग,संस्थेेेचे अध्यक्ष तथा माजी सभापती आर.के.पाटील सर,

Rate Card

संस्थेचे संचालक जी.आर. पाटील , श्रीकांत पाटील सर,मुख्याध्यापिका सौ.ज्योतीआर.पाटील,प्रा.आर.बी.पाटील,

सौ.सुरेखा पाटील,सौ.कविता पाटील, किरण पाटील,अप्पासाहेब पाटील,माजी समाजकल्याण सभापती आकाराम मासाळ,प्रा.बी.एस.पाटील,तम्माराव बागेळी,माजी सैनिक अब्बास सैय्यद आदी उपस्थित होते.

 ब्रम्हानंद पडोळकर म्हणाले,दुष्काळी भागात या महाविद्यालयाच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध झाल्या आहेत.उच्च शिक्षण यापुढच्या काळात महत्व आहे. जत तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.राज्यात जत तालुक्यात अधिकाऱ्यांची फळी दुष्काळी प्रतिमा बदलील अशी कामगिरी करा असे आवाहन यावेळी विद्यार्थांना पडळकर यांनी केले. 

संख ता.जत येथील आर.के.महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ.अमृत्तानंद महास्वाजी बाजूस तम्माणगोंडा रवीपाटील, ब्रम्हानंद पडळकर,जी.आर.पाटील आदी


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.