संकेत टाइम्सच्या वृत्तांची दखल,यापुढे सातत्य गरजेचे
डफळापूर : डफळापूरातील मटका,जूगार या अवेद्य धंद्याला अखेर लगाम लागल्याचे चित्र आहे.गेल्या दोन आठवड्यापासून मटका चिठ्ठी हद्दपार झाली आहे.मात्र काही एंजन्टाकडून मोबाईलवर फोटो काढून छुपा मटका सुरू असल्याचे आवाई आहे.जुगार अड्डाही चालू बंद स्थितीत आहेत.
डफळापूरातील अवेद्य धंदे बंद व्हावेत यासाठी दैंनिक संकेत टाइम्स व संरपच बालिकाकी यांनी मोहिम उघडली आहे.त्याला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. भर बाजारपेठेतील चौक व बुवानंद मंदिरासमोरील मटका अड्डे अखेर बंद झाले आहेत.पोलीसांनी यात विशेष लक्ष घातल्याने हे यश आले आहे. अवैद्य धंद्याच्या आहारी जाऊन काही बेरोजगार तरूण,कामगार देशोधडीला लागले आहेत.त्या पार्श्वभूमीवर हे धंदे बंद व्हावेत अशी मागणी जोर धरली होती.पोलीसांनी जनतेचा दबाव वाढल्याने आक्रमक होत यावर कारवाई करत पायबंध घातला.आता यात सातत्य राहणे गरजेचे आहे.यापुढेही संकेत टाइम्स व संरपच बालिकाकाकी चव्हाण यांची मोहिम सुरूच राहणार आहे. पोलीसांनी कायम सतर्क रहावे अशी मागणी आहे.दरम्यान अनेक दिवसापासून ठिय्या मांडलेल्या अवैध धंद्याला चाप बसल्याने अनेकांनी अभिनंदन केले.