विशेष पथकाची कारवाई : 14 हाजाराचा मुद्देमाल जप्त
जत,प्रतिनिधी : गुगवाड नजिकच्या वज्रवाड फाट्यावर भेसळ युक्त बेकायदा सिंदी विकणाऱ्या अड्ड्यावर विशेष पथकाने छापा टाकला.130 लिटर भेसळयुक्त सिंदी,1410 रूपये रोख असा 13 हाजार 370 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.तर याप्रकरणी यमण्णाप्पा महानिंग वडीवडर याला ताब्यात घेतले.गुरूवारी साडेतीन वाजता ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुखाच्या सा.पोलीस निरिक्षक कैलास कोडक यांच्या विशेष पथकांने केली.गुगवाड हद्दीतील वज्रवाड फाटा येथे हा अवैद्य सिंदीचा अड्डा थाटला होता.
जत तालुक्यात बेकायदेशीर सिंदी विकणारे अड्डे बेसुमार वाढले आहेत.सिंदीच्या झाडाची सिंदी कालबाह्य झाली असतानाही हाजारो लिटर सिंदी येते कोठून हा प्रश्न उपस्थित होत आहे. रसायन वापरून बोगस सिंदी तयार केली जाते.जत पश्चिम भागातील सर्वच गावे व्यापले आहेत.या सिंदीमुळे अनेकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. त्या विरोधात धडक कारवाई करून या अड्ड्याची कायमस्वरूपी स्वच्छता करावी अशी मागणी आहे.