जत | तम्माणगोंडा रवीपाटील विधानसभेच्या रिंगणात |

0
2

जत येथील पत्रकार परिषदेत घोषणा 


जत,प्रतिनिधी : जत विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले आहे.जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांनी भाजपाच्या विधानसभा तिकिटावर आपली दावेदारी दाखल केली. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढविणार अशी महत्वपूर्ण घोषणा मंगळवारी पत्रकार बैठकीत केली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकात गुड्डोडगी हेही उपस्थित होते.

लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राजकीय नेत्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत.अनेक दिग्गज नेत्यांनी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.देशात व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप मध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती तम्मानगोंडा रवीपाटील यांनी जत तालुक्याच्या राजकारणात खळबंळ उडवून दिली आहे.

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तम्माणगोंडा रवीपाटील म्हणाले,जत तालुक्यातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्याची व जनतेची इच्छा असल्याने मी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.31 मे रोजी उमदी येथील मलकारसिध्द देवाच्या मंदिरात जनसंपर्क अभियानाचा नारळ फोडून प्रांरभ केला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळचे संचालक व भाजपा नेते डॉ.रविंद्र आरळी,तालुकाध्यक्ष चद्रकांंत गुड्डोडगी,संजय तेली. शिवाजीराव ताड,सोमनिंग बोरामणी यांच्यासह अनेक कार्यक्रर्ते उपस्थित होते.

गेल्या तीन पिठ्यापासून रवीपाटील घराणे राजकारणात आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्तेत आहे.पहिंल्यादाच मला सभापती पदाची संधी देण्यात आली.त्या पदाला मी न्याय दिला आहे. जत तालुक्यातील पुर्व भागातील 48 गावांना पाणी देणे हीच आपली भूमिका आहे.त्यासाठी आम्ही कर्नाटक व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, राज्यपाल व अनेक मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला मात्र काही राजकीय नेत्यांनी या पाणी योजनेला खो घालण्याचा प्रयत्न केला.तालुक्यात नवीन नेतृत्व तयार होऊ नये, यासाठी पक्षातील काही जेष्ठ नेते अन्याय करत आहेत.मात्र जनताच आमच्या पाठिशी असल्याने मी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे.यावेळी गुड्डोडगी म्हणाले,जत तालुक्यातून सलग तिन वेळा भाजपचा आमदार निवडून आला आहे. तर दोन वेळा लोकसभा निवडणूकीत तालुक्यातून भाजपाला लिड मिळाले आहे. आम्ही तळागाळापासून पक्ष बांधणी केली आहे. मात्र मागील तीन विधानसभा निवडणूकीत भाजपमध्ये सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही.तिन्ही वेळा बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला तिकिट देण्यात आले. त्यामुळे आता पक्षात राहून काम करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्याला व पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्यांना उमेदवारी देण्यात यावी.व्यक्ती म्हणजे पक्ष ही प्रवत्ती मोडून काढण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here