डफळापूर | जत-सांगली रस्ता शेतकऱ्यांनी तासभर रोकला |

0

Rate Card

मिरवाड तलावात पाणी सोडण्याची मागणी : आश्वासनानंतर आंदोलन मागे

डफळापूर, वार्ताहर : मिरवाड ता.जत येथील तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी डफळापूर -जत रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला.गुरूवार बाजाराचा दिवस असतानाही मोठ्या संख्येने शेतकरी मोर्च्यात सहभागी झाले.रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी गर्दी झाली होती. 

शेतकऱ्यांनी बैलगाड्या,मेंढरे रस्त्यावर उतरवली होती.म्हैसाळ देवनाळ कालव्यातून पाणी सोडण्यात यावे या मागणीचा सहानभुतीपुर्वक विचार करण्यात येईल,त्यासंदर्भात आज वारणाली येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंदोलक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,कॉम्रेड हणमंत कोळी,बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,किसान सभेचे सचिव दिगंबर कांबळे,हणमंत कांबळे,विक्रम ढोणे,अतुल शिंदे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.