जत,प्रतिनिधी: जत शहरातील यल्लम्मा देवी मदिंरा नजिकच्या नगरपालिकेच्या विहिरीत गेल्या पाच महिन्यापुर्वी राधिका सुभाष कोळी या महिलेने तीन मुलांसह आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी पुन्हा त्या विहिरीत एका तीस वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पंरतू काही नागरिकांनी प्रंसगावधन राखत तिला तातडीने विहिरी बाहेर काढल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला.मात्र तिला गंभीर दुखापत झाली आहे.दरम्यान महिलेला काढतावेळी विहिरीत एक दुचाकी सापडली आहे. राधिकाच्यासह तीन मुलाच्या आत्महत्येमुळे विहिरीवर जाळी टाकण्याची मागणी केली होती.मात्र गेल्या पाच महिन्यापासून निष्क्रिय नगरपालिका प्रशासनाने त्याबाबात गांर्भिर्य घेतले नाही.परिणामी आजही ही विहिर यमदूत होता होता वाचली.शहरापासून सुमारे दोन किलोमीटर लांब हि विहिर आहे.अगदी प्रसिध्द श्री.यल्लम्मा देवीच्या मंदिराला लागून असणाऱ्या या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विहिरीला वरून जाळी टाकून बंद करणे गरजेचे होते.मात्र जाळी नसल्याने या तीन निष्पापांना जीव गमवावा लागला आहे.विशेष म्हणजे जत शहराला पाणी पुरवठा या विहिरीतून होतोयं.विहिरीवर जाळी असतीतर हा प्रकार झाला नसता असा काहीसा सुरू उपस्थितामधून व्यक्त होत होता.ग्रामपंचायत असल्यापासून जत शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी येथे विहिरी खोदण्यात आली आहे.यल्लम्मा मंदिलाला लागून ओढापात्रात ही विहिरी आहे.बाजूने कठडा आहे.मात्र सुमारे 50 फुट खोल असलेल्या विहिरीवर जाळी नाही.त्यामुळे धोकादायक विहिरी होती.या परिसरात कायम भाविकांची गर्दी असते.त्यामुळे करोडो रुपये खर्च करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला या विहिरीवर जाळी टाकता आली नाही.त्यामुळे असा प्रकार उद्भवला आहे.आतातरी प्रशासनाने बोध घेऊन विहिरीचे वरील भाग जाळी टाकून बंद करावा अशी मागणी होत आहे.नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा विहिर धोकादायक बनली आहे.तीन चिमुकल्यासह चार जीव यापुर्वी गेले आहेत.मंगळवारी एका महिलेचा जीव जाताजाता वाचला आहे.आतातरी जाळीबसविली जाणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जाळी बसविण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
मंगळवारी जत दौऱ्यावर आलेले जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत चौधरी यांच्यासमोर काही नगरसेवकांनी विहिरीचा विषय मांडला.त्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते.अशा घटनांमुळे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.त्यावर्ती जिल्हाधिकारी चौधरी यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांना जाळी टाकण्याचे आदेश दिले.
पालिकेची यमदूत ठरलेली विहिर