जत प्रतिनिधी: जत येथील श्री.बालाजी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बिगर शेती पतसंस्थेचे उद्घाटन शनीवार ता.6 एप्रिल गुढीपाडव्याच्या शुभमुहर्तावर होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा संस्थापक अध्यक्ष विजय बाबुराव नाईक यांनी दिली. जत येथील विजयवाणीचे संपादक विजय नाईक यांनी गंगा चरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही पतसंस्था उभारली आहे.
त्याचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे.
संस्थेचे संचालक मंडळ असे: मोहन माने -पाटील, भीमराव राठोड, सुरेश चव्हाण, राजाराम ऐवळे, विनित राठोड, मधुकर चव्हाण, बाबुराव नाईक, करण राठोड, सुजाता चव्हाण व मंगल राठोड असे संचालक मंडळ आहे.
जत शहरातील गोरगरीब मजुरांना व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना कर्ज देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व त्यांची पत वाढविणे हा या संस्थेचा मुळ उद्देश आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी उद्घाटन होणार आहे. या संस्थेस नुकतेच नोंदणी पत्र मिळाले असून त्याचा क्रमांक असा: एसएएन/ जेएटी/आरएसआर/ सीआर/559/2018-19 असा आहे. गंगा ट्रस्टमार्फत जत, विजापूर व बागलकोट अशा तीन ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटर्स आहेत. यामार्फत रुग्णांची सेवा केली जात आहे.आता नव्याने या संस्थेची भर पडली आहे.