शिराळा : शिराळा शहरातील श्रीराम कॉलनी परिसरात गेल्या 18 वर्षापासून विज वितरण कंपनीच्या वतीने होणारा विजपुरवठा कमी दाबाने होत होता.गेल्या 18 वर्षात अनेकवेळा या कॉलनी परिसरातील नागरिकांनी विज कंपनीकडे तक्रारी केल्या होत्या.मात्र या भागातील विजपुरवठ्याची नेमकी समस्या निघाली नव्हती.डफळापूरचे नवोदित अभियंता म्हणून रुपेश रावसाहेब कोरे यांची शिराळा विभागात नुकतीच नेमणूक झाली.त्यांना ही समस्या सांगण्यात आली.कोरे यांनी परिसरात होणाऱ्या विजपुरवठ्याच्या वाहिन्या,टान्सफार्म सह विविध बाबीचा अभ्यास करून त्यापरिसरातील संपुर्ण विज पुरवठ्या
संदर्भातील समस्या निकाली काढली.त्यामुळे आता त्या भागात उच्चतम दाबाचा विजपुरवठा होत आहे. उत्कृष्ट कामाबद्दल अभियंता रुपेश कोरे यांचा व त्यांचे वरिष्ठ अधिकारी श्री.बुचडे यांचा तेथील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त करत दोघाचा सत्कार केला.
शिराळा येथे अभिंयता रुपेश कोरे व कार्यकारी अभिंयात श्री.बुचडे यांचा सत्कार करण्यात आला.