जतेत पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या

0

जत,प्रतिनिधी : पंचायत समिती जतचे लिपिकांने शासकीय निवासस्थानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवार(ता.4) उघडीस आली.दीपक सोनाजी बर्गे(मुळ गाव हिंगोली,सध्या रा.शासकीय निवासस्थान जत)असे मयत लिपीकाचे नाव आहे.

याबाबतचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला आहे.

Rate Card

पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दीपक बर्गे हे अनेक वर्षापासून जत पंचायत समितीकडे समाजकल्याण विभागात लिपीक म्हणून काम करत होते.बर्गे पत्नी चार मुलासह जत येथील पंचायत समितीच्या शासकीय निवासस्थात वास्तव्यास होते. बुधवारी गावी हिंगोलीत लग्न कार्य असल्याने पत्नी व त्यांची मुले हिंगोलीला गेले होते.बुधवारी बर्गे यांनी पंचायत समितीत कामकाम केले.गुरूवारी दीड वाजण्याच्या अगोदर त्यांनी निवासस्थानातील अंगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान पंचायत समितीत बर्गे आले नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीत डोकावून बघिल्यावर हा प्रकार समोर आला.याबाबत जयकुमार सोहनी(रा.कोसारी)यांनी जत पोलीसात फिर्याद दिली. पोलीसांनी मृत्तदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला, मात्र बर्गे यांच्या जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांच्या पत्नी व नातलग हिंगोली येथून येईपर्यत शवविच्छेदन केले नव्हते.त्यामुळे रात्री उशिरापर्यत मृत्तदेह शासकीय रुग्णालयातील पीएम कक्षात ठेवण्यात आला होता. त्यादरम्यान बुधवार दिवसभर ते तणावात असल्याचे त्यांच्या बरोबरच्या काहीजणांनी सांगितले.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.मात्र आर्थिक अडचण किंवा कामाचा ताण यामुळे बर्गे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. बर्गे यांच्या मोबाईलवरील संभाषणावरून काही गोष्ठी स्पष्ट होऊ शकणार आहेत.अधिक तपास उपनिरिक्षक श्री.पवार करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.