जत | परिचारिकेचा संशयास्पद मृत्यु |

0
2

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका असलेल्या महिला संभाजी चौकातील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ माजली आहे.उज्वला शिवाजी खंडागळे(वय-40) असे त्यांचे नाव आहे.उज्वला उर्फ पिंकी यांचे जत हेच माहेर आहे.त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून काम करत होत्या.त्यांची मुलगी व त्या संभाजी चाैकात भाड्याने खोली घेऊन रहात होत्या.  त्याची मुलगी छत्रीबाग येथे आजोळी गेली होती.उज्वला एकट्याच घरी होत्या.तीन दिवसांपासून त्यांच्या माहेरचे कोणीही आले नव्हते.सोमवारी उज्वला यांचा भाऊ अक्षय नेटके हा खोलीवर आला. तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराचवेळ हाका मारूनही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संशय आल्याने दरवाजा मोडून काढला.उज्वला या मृत आवस्थेत आढळून आल्या.  त्यांनी दोन-तीन दिवसापुर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून,रात्री उशिरापर्यत मृत्तदेह शवविच्छेदन व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here