विटा : माझी लायकी काढणारे सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील, मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे.कुणाची किती लायकी आहे ती आत्ता जनता दाखवेल. माझा पक्ष अजून निश्चित नाही, मात्र जो पक्ष देईल ती उमेदवारी, नाही तर अपक्ष, मात्र मी निवडणूक नक्की लढवणार आहे, असा निर्धार भाजपाचे नाराज नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.विटा येथे गोपीचंद पडळकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जत तालुक्यात गोपीचंद पडळकरांचा वारू थोपविण्याचे आवाहन
दरम्यान जत तालुक्यात गोपीचंद पडळकर यांचा वारू थोपविण्याचे मोठे आवाहन खासंजयकाका पाटील यांच्यासमोर असणारे आहे.कारण धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या पडळकर यांना माननारा मोठा वर्ग जत तालुक्यात आहे.पडळकरांनी आता भूमिका स्पष्ट केल्याने त्यांच्या समर्थकांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.