जत | बोरनदीवर 10 चेकडँमचे आज भूमीपुजन |

0
1

जत,प्रतिनिधी : जत पुर्व भागातील वरदान ठरणाऱ्या बोर नदीवरील 10 चेक डँमचे भूमीपुजन आज बुधवार 6 रोजी आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या 10 चेकडँमसाठी 9 कोटी 17 लाख रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. बोर नदीवरील सोनलगी न.1(जाधव शेत),सोनलगी 2 (मासाळवाडी जवळ),उमदी संगम,बालगाव,बेंळोडगी,खंडनाळ,पांढरेवाडी,जाळीहाळ 1 खु.(कमत शेत),जाळीहाळ खु. 2 (बिराजदार शेत), सिध्दनाथ असे डँम होणार आहेत.यामुळे पावसाळ्यात कर्नाटकात वाहून जाणारे पाणी अडविले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढणार आहे.या कामासाठी आ.विलासराव जगताप यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केली होता.त्यासाठी आता निधी उपलब्ध झाला असून जत जलसंधारण विभागाकडून पुढील वर्षापर्यत या डँमचे काम पुर्ण करून पाणी अडविण्यात येणार आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमास सभापती सौ.सुशीला तावंशी, उपसभापती आडव्यप्पा घेरडे,माजी सभापती प्रकाश जमदाडे,भाजपचे कार्याध्यक्ष सुनील पवार,जि.प.सदस्य सरदार पाटील,सौ.स्नेहलता जाधव,सौ.मंगल नामद,सौ. सुनिता पवार,सौ.रेखा बागेळी,पं.स.सदस्या सौ. मंगलताई जमदाडे,सौ. श्रीदेवी जावीर,सौ.लक्ष्मी माळी,सौ.सुप्रिया सोनुर,सौ. कविता खोत,रामण्णा जिवन्नावर,मनोज जगताप, विष्णू चव्हाण उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास संबंधित गावातील सरपंच,उपसरपंच, सोसायटी चेअरमन,ग्रामस्थ, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार विलासराव जगताप यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here