जतेत | पुन्हा चोऱ्याचे सत्र,मार्केट यार्डातील तीन दुकाने फोडली |

0

व्यापाऱ्यांच्या प्रंसगावधामुळे आर्थिक हानी टळली

जत,प्रतिनिधी : जत शहरातील चोरीचे सत्र थांबता  थांबत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी मध्यरात्री मार्केट यार्डातील पुन्हा दुकाने फोडून दुकानातील साहित्य,रोख रक्कमा,सीसीटिव्हीचे नुकसान करण्यात आले. चोरीच्या रक्कमा कमी असल्याने याबाबत जत पोलीसात कोणीही अद्यापर्यत तक्रार केली नव्हती.मात्र चोरीसत्राने पुन्हा जत शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

Rate Card

अधिक माहिती अशी, जत शहारतील विजापूररोडवरील मार्केट यार्ड मधील संदिप आरबळी यांचे अडत दुकानाचे शटर उचकाटून काही साहित्य सीसीटिव्ही कँमेरा,डीव्हीआर मशीन पळविली.त्यांच्या लगतचे शिवकुमार बेंळूखी यांच्या अडत दुकानाचे शटर कटावणीने उचकटून रोकड न मिळाल्याने चोरट्यानी साहित्याची नासधूस केली.साईराम कृषी सेवा केंद्राच्या गोडावणचे शटर,कडी कापून आत प्रवेश केला.तेथेही काही किंमती वस्तू व रोखड न मिळाल्याने साहित्याची नासधूस केली.त्याशिवाय अन्य काही दुकानातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळतेय.मार्केट यार्ड ही चोरीची तिसरी घटना आहे. सततच्या चोरीच्या अशा प्रकाराने व्यापाऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे.मार्केट यार्डातील दुकाने आतमध्ये असल्याने चोरीचा प्रकार कुणाच्या लवकर लक्षात येत नाही.त्यामुळे सतत असे प्रकार घडत आहेत.पोलीसाच्या गस्ती पथकाने मार्केट यार्डातही फेरी मारावी अशी मागणी होत आहे.सततच्या चोऱ्यांच्या घटनेने वैतागलेले येथील व्यापारी तसे निवेदन जिल्हापोलीस प्रमुखांना देणार आहेत.

जत मार्केट यार्डातील संदीप आरबळी यांच्या अडत दुकानातील सीसीटिव्ही साहित्याची नासधूस करत डीव्हीआर पळवीला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.