जत,प्रतिनिधी :काश्मीर येथे झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्त आज जत,डफळापूर,येळवी परिसरात बंद पुकारण्यात आला.नागरिकांनी स्वतःहून एक दिवसीय बंद ठेवला आहे.शहीद जवानांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.पाकिस्तानच्या निर्षेधार्थ घोषणा देण्यात आल्या.आतंकवाद्यांना पहिली गोळी घाला अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.डफळापूर : दहशतवादी हल्ल्याचा निषेर्धात वसईत आज शनिवार (ता.16) फेब्रुवारी रोजी दुकाने बंद, निषेध मोर्चा, सभा, श्रद्धाजली अर्पण करत आपला निषेध व्यक्त केला. सकाळी शालेय मुलासह जत-सांगली रोडवर काहीकाळ रास्ता रोको केला.शहीद जवानान श्रंध्दाजली वाहण्यात आली.काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यासाठी सकाळ पासून उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला, यात दुकाने, हॉटेल बंद ठेवण्यात आली होते.तालुक्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. यात सर्व, सामाजिक कार्यकर्ते, शाळकरी विद्यार्थी, व्यापारी, दुकान चालक, यांनी सहभाग घेत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणा बाजी देत शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आणि या भ्याड हल्ल्याचे पाकिस्तान आणि दहशतवादीना चोख उत्तर देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. तालुक्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी व सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकजुट होऊन काढली दहशदवादी हल्याच्या निषेधार्थ रॅली व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
जत शहरातील बाजार पेठेत असा कडकडीत बंद होता.डफळापूर येथे जत-सांगली रस्त्यावर श्रंध्दाजली वाहून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.