जत | आता ‘भाईचा बड्डे’ पोलिसांच्या रडारवर!,जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले कारवाईचे आदेश

0

हद्दपार,स्थानबंद,मोकाचा दणका देणार

जत,प्रतिनिधी : जेव्हापासून मुळशी पॅटर्न चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळीच  क्रेझ निर्माण झाली. मग, काय प्रत्येक भाईला आपलापण वाढदिवस तसाच आणि तितक्याच धूमधडाक्यात आणि दणक्यात साजरा झाला पाहिजे असे वाटू लागले; पण…भाईलोग आता जरा सावधान….कारण, तुम्ही साजरा करत असलेल्या वाढदिवसाची गंभीर दखल घ्यायला पोलिसांनी सुरुवात केलीय. विशेष म्हणजे गुन्हेगारांचे शहरातील ज्या भागांमध्ये वर्चस्व आहे त्या भागात साजर्‍या होणार्‍या वाढदिवसांवर गुन्हे शाखेची करडी नजर असणार आहे.

Rate Card

शनीवारी जत येथे आलेल्या जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांनीही अशा भाईगिरी व त्यांच्या चेल्यावर हद्दपार,स्थानबंध्द,मोका सारख्या कारवाया करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जत तालुक्यातील अशा गुन्हेगारीची यादी माझ्याकडे आली आहे.निवडणूकीच्या पाश्वभुमीवर त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याचे शर्मा यांनी सांगितले.त्याशिवाय शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जादा वाहतूक पोलीसाची नेमणूक केली आहे. शहरातील वाहतूक कों डी सोडविण्यासाठी जत पोलीसांना सुचना दिल्या.दरोडा चोऱ्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आम्ही आवळल्या आहेत.त्यामुळे यापुढे कोणत्याही गुन्हेगारांने कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये असेही शर्मा यांनी सुनावले.पोलीस निवासस्थानाचा जिल्ह्यात 18 ठिकाणचे प्रस्ताव सरकारला दिले आहेत.त्याचा पाठपुरावा सुरू आहे.जत पोलीस ठाण्याचा पेट्रोल पंप,स्कूल काढण्याचा मानस आहे.त्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या त्या पुर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.असे शर्मा यांनी सांगितले. शहरासह तालुक्यातील अनेक गावात अनेक ठिकाणी रात्री-अपरात्री फटाक्यांचा आवाज आणि डीजेचा दणदणाट करत मोठ्या आवाजात वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होतो. पोलिसांत तक्रार करायची म्हटले तर संबंधित लोकांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्यामुळे कोणी समोर येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भरचौकात साजर्‍या केल्या जाणार्‍या वाढदिवसाचे फॅड वाढत असल्याचे दिसत आहे.


वाढदिवस शक्ती प्रदर्शनाचे माध्यम

आपण भाई आहोत, आपला कसा दरारा आहे हे दाखवण्यासाठी अनेक तथाकथितांकडून वाढदिवसाचे आयोजन केले जाते. या टवेळी मोठ्या प्रमाणात मित्रमंडळी, हस्तकांना जमवून शक्ती प्रदर्शन केले जाते. जेवढी वाढदिवसाला संख्या जास्त तेवढा मोठा भाई असे या विश्‍वात मानले जाते. त्यामुळे गुन्हेगारी जगतात वाढदिवस शक्ती प्रदर्शनाचे माध्यम ठरत आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न होतोय निर्माण

अनेकदा वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार, कोयत्यासारख्या घातक हत्यारांचादेखील वापर केला जातो आहे. वर्चस्ववादाच्या लढाईतून वाढदिवशीच अनेक वेळा दोन गटांमध्ये गंभीर स्वरूपाचे वाददेखील झालेले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न दिवसेंदिवस निर्माण होतो. 

घातक शस्त्रे भेट देण्याचे फॅड

वाढदिवसाच्या माध्यमातून आपल्या भाईगिरीची ओळख निर्माण करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये मोठमोठे फ्लेक्स लावले जातात. यावर अनेक समर्थकांचे फोटो छापले जातात. त्यातील अनेक जणांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असते. एवढेच नाहीतर काही जणांवर गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांची नोंददेखील असते. त्यामुळे अशा कार्यक्रमातून एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव मिळत असल्याचे कायद्याचे जाणकार सांगतात. हल्ली तलवारीने केक कापण्याबरोबरच घातक प्रकारची शस्त्रेदेखील वाढदिवसाला भेट देण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता शहरात साजरे होणार्‍या वाढदिवसांची गांभीर्याने दखल घेण्यास सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.