वळसंग,वार्ताहर: जत तालुक्यातील शेड्याळ येथील ग्रामदैवत मड्डीसिद्ध मंदिराच्या पाठीमागील “मौत का कुआ” म्हणून गाजलेल्या विहिरीची दैंनिक संकेत टाइम्स मधील बातमी नंतर ग्रामपंचायत प्रशासनाने जागे झाले.पाणी आणण्यासाठी गेलेला एक ग्रामस्थ दुचाकीसह विहिरीत पडला होता.विहिरीचे कठडे नादुस्त असल्याने हा प्रकार घडला होता.अखेर पडझड झालेल्या विहिरीकडे लक्ष देत विहिरीच्या सुरक्षतेबाबत दखल घेतली. विहिरीचा कठडा आणि ऱ्हाट दुरुस्त करून घेतला. सरपंच मनीषा नरुटे संकेत टाइम्सशी बोलताना म्हणाले की,गावातील अतर्गंत वादामुळे विहिरीत पडलेले देवर्षी यांची बातमी छापून आली,विहिरीची किरकोळ पडझड झाली होती.तीतकी धोकादायक विहिर नव्हती,तरीही आम्ही त्यांच्या कठड्याची दुरूस्ती केली आहे.गावातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी संपविण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत.ग्रामसेवक नदाफ म्हणाले की, गावातील होणाऱ्या विविध कामामुळे येत्या काळात गावाचे रुप बदलेल.गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमचे कर्तव्य म्हणून त्याकडे जातीने लक्ष घालून प्रश्न सोडवू.
शेड्याळ ता.जत येथील मौत का कुवा बनलेल्या विहिरीची ग्रामपंचायतीने दुरूस्ती केली आहे.