माडग्याळ,वार्ताहर : दरीबडची(ता.जत)येथे तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.गावात व वाडीवस्तीवर पाणी टंचाई असल्याने ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव तहसिलदार कार्यालयास देऊनही अद्याप टँकर देण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.टँकर न मिळाल्यास 3 डिसेंबरला गाव बंद करून ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर घागरी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.तसे निवेदन आमदार,उपविभागीय पोलीस अधिकारी जत,प्रांताधिकारी,गटविकास अधिकारी, जत तहसीलदार कार्यालय जत,पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.जत पूर्व भागातील दरीबडचीमध्ये गेली तीन महिने झाले पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी विहीर सिद्धनाथ तलावजवळ आहे.तलावच कोरडा पडल्याने विहिरीचे पाणी स्ञोत आटले आहेत.त्यामुळे तीन महिने झाले गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.गावभागासह मानेवस्ती,चव्हाणवस्ती, मासाळवस्ती,माळीवस्ती,मोरडीवस्