उमदी,वार्ताहर: कोणबग्गी ता.जत येथील भाग्यश्री शिवानंद बिराजदार वय-24 हिचा विहिरीत पडून संशास्पद मुत्यू झाला.याबाबतचा गुन्हा उमदी पोलीसांत दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी,भाग़्यश्री ही दररोजप्रमाणे विहिरीच्या कडेला जळण गोळा करत होती.तीचा अचानक विहिरीत पडली.तिला पोहायला येत नसल्याने तिचा बुडून मृत्यु झालेचे कोनबग्गीचे पोलीस पाटील उमेशकुमार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.
गोंधळेवाडीत एकास सख्या भावाची मारहाणउमदी,वार्ताहर: गोधळेंवाडी ता.जत येथे शेतातील पाईप तोडल्याच्या वादातून विठ्ठल कृष्णा मोरे यांनी मारहाण केल्याचा विठ्ठल यांचा भाऊ मधुकर कृष्णा यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.गोंधळेवाडी मोरे बंन्धूची एकमेका लगत शेती आहे.विठ्ठल यांची जमीनीतून पाईपलाईन आहे.रवीवारी मधुकर यांनी ती पाईपलाईन तोडली.यांचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या विठ्ठलला मधुकर यांने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून काठीने मारहाण करून जखमी केले.तसा गुन्हा उमदी पोलीसात दाखल झाला आहे.
बनावट नोटाची भिती घालत साडेसत्तरा हाजार लांबविले
उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथील खंडू आमसिध्दा शिंदे वय-26 यांनी बँकेतून काढलेल्या पैसे खोटे असल्याचे सांगत 17,500 रूपये लंपास केल्याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
खंडू याने सोमवारी उमदीतील बँक ऑफ इंडिया शाखेतून 56,500 रूपये काढले.त्याचवेळी शेजारी बसलेल्या अनओळखी माणसाने पाचशेच्या नोटा बनावट असण्याची शक्यता आहे. म्हणत खंडूकडच्या पाचशेचा नोटाचा बंडलमधून काही पाचशेच्या नोटा काढत ह्या बनावट असण्याची शक्यता आहे. असे सांगितल्याने खंडूने ती नोट कँशीयर कडून बदलून घेत असताना नोटाच्या बंडलमधील साडेसत्तरा हाजार रूपयेला लंपास केल्याचे खंडूच्या लक्षात आल्याने त्यांने उमदी पोलीसात धाव घेत फिर्याद दिली. अधिक तपार हवलदार वळसंग करत आहेत.