वाहनाच्या धडकेत गुगवाडची महिला ठार

0
5

जत,प्रतिनिधी :तालुक्यातील गुगवाड येथे शेळ्या चरविण्यासाठी चाललेल्या महिलेला टेम्पोने धडक दिल्याने ती जागीच ठार  झाली.तायव्वा गुरूपाद आवटी,(वय-55)असे महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. तायव्वा या अथणीरोडकडून गुगवाड गावाकडे शेळ्या घेऊन निघाल्या होत्या. यावेळी बीड येथील ऊसतोडणी मजूर घेऊन एक टेम्पो अथणीकडे जात होता.  भरघाव टेंम्पोने तायव्वा यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर जखम  झाली.  रक्तस्त्राव झाल्याने त्या जागीच ठार  झाल्या.

अपघातानंतर चालकाने वाहनासह पलायन केले.  मात्र अपघाताच्या धक्क्याने टेंम्पोमधील एक मजूर खाली पडला.त्याचे नाव गोरख ज्ञानोबा मुंढे,रा.कोटरबन चौंडी, ता.वडवणी, जि.बीड असे आहे. या मजूरांने चालकाचे नाव ग्रामस्थांना सांगितले. वाहनचालक महादेव चंद्रसेन मुंडे, रा.चौंडी  ता.वडवणी जि.बिड यांच्यावर जत पोलीसात गुन्हा दाखल  झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here