शाळेसाठी आलेले औषधे रस्त्यावर फेकली
माडग्याळ,वार्ताहर : तालुक्यातील माडग्याळ ते राजोबाचीवाडी या रस्त्यावर मुदत बाह्य मायक्रोन्युट्रीअन्ट सप्लीमेन्ट औषधाच्या बाटल्या उघड्यावर टाकून देण्यात आल्या आहेत.शाळेत मध्यान्ह भोजनाच्या वेळी मायक्रोन्युट्रीअन्ट सप्लीमेन्ट हीऔषधे दिली जात होती.पंरतू या बॉटलची मुदत संपेपर्यत का ठेवल्या,मुलांना औषधे दिली का असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.
पण त्या औषधच्या बाटल्या रस्त्यावर का टाकल्या याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.माडग्याळ ते राजोबाचीवाडी या रस्त्यावर ही मुदत बाह्य औषधे उघड्यावर फेकून दिली आहेत.या औषधाची मुक्त संपली आहे.त्यांची योग्य विल्हेवाट लावणे गरजे होते.पंरतू उघड्यावर टाकल्याने धोकादायक बनली आहेत.महाराष्ट्र गर्व्हमेंट यांच्यासाठी वापरावयची औषधे असे बाटलीवर इंग्रजीत लिहले आहे.औषधे अशी उघड्यावर टाकू नयेत असा नियम असताना असा कोणत्यातरी शाळेने हा प्रकार केल्याची चर्चा सुरू आहे.

माडग्याळ ते राजोबाचीवाडी येथे रस्त्याकडेला मायक्रोन्युट्रीअन्ट सप्लीमेन्ट औषधच्या बाटल्या टाकून देण्यात आल्या आहेत.