जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपच्या सौ.सुशिला शिवाप्पा तावशी यांची बिनविरोध निवड झाली.दरम्यान सभापती निवडणूकीत कॉग्रेसने घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हाणून पाडण्यात आल्याची टिका आ.विलासराव जगताप यांनी केली.
पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी तहसीलदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती.सभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी काम पाहिले.सभापती पदासाठी भाजपच्या बसर्गी पंचायत समिती गणातील सौ.सुशिला शिवाप्पा तावशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सौ.तावशी यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा तहसीलदार पाटील यांनी केली. या बैठकीस कॉग्रेसचे दोन सदस्य वगळता सर्व सदस्य उपस्थित होते.
निवडी नंतर झालेल्या बैठकीत आ.जगताप म्हणाले,जत पंचायत समिती मध्ये भाजप,वंसत दादा आघाडी व जनसुराज्य यांची युक्ती आहे.आमचे एकूण 11 सदस्य आहेत.सभापती पदासाठी कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी कुठील डाव रचला होता.प्रत्येक सदस्याला पाच लाख रुपयाचे देण्याचे आमिष दाखविले होते.मात्र त्यांच्या आमिषाला कुणीही बंळी पडले नाही. त्यामुळे कॉग्रेसचा डाव हाणून पाडण्यात आला आहे. लवकरचं उपसभापती पदाचाही बदल करण्यात येईल,असे संकेत आ.जगताप यांनी दिले.
मावळत्या सभापती मंगल जमदाडे यांनी राजीनामा दिल्याने नुतन सभापतीची निवड करण्यात आली. निवडी नंतर आ.जगताप,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, जेष्ठ नेते शिवाजीराव ताड, शिक्षण व आरोग्य सभापती तम्माणगोंडा रवीपाटील, यांनी नुतन सभापतीचा सत्कार केला.त्यांनतर कार्यकर्त्यांनी नुतन सभापतीची जत शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रभारी सभापती शिवाजी शिंदे यांनी नुतन सभापती सौ.तावशी यांच्या कडे पदभार दिला.
जत,पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर सौ.सुशिला तांवशी यांचा सत्कार करण्यात आला.