बिरनाळमध्ये झोपडी जळून 2 लाखाचे नुकसान

0
7

जत,प्रतिनिधी:तालुक्यातील बिरनाळ येथील शेतकरी पांडुरंग हणमंत बंडगर यांच्या झोपडी वजा घरास आग लागून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.
सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चुलीतील विस्तवामुळे घरास आग लागली. बाजूंनी पाल्याचे कूड असल्याने आग आटोक्यात आली नाही.आगीत सर्व घर भस्मसात झाले. धान्याची पोती, संसारोपयोगी साहित्य,एक तोळ्याची बोरमाळ,ऊसतोडीसाठी मुकादमाकडून उचल म्हणून घेतलेले पन्नास हजार रूपये भस्मसात झाले.पं स.सदस्य नाथा पाटील यांनी तातडीने तलाठ्यास बोलावून पंचनामा केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here