विक्रम फाऊंडेेशनच्या 20,21 ला “भव्य दांडिया स्पर्धा”

0
8

जत,प्रतिनिधी: सालाबादप्रमाणे विक्रम फाऊंडेेशनच्या वतीने भव्य दांडिया स्पर्धा -2018 चे आयोजन करण्यात आले आहे.ता.20,21 ला स्पर्धा होणार आहेत. यावर्षी कलर्स मराठी वाहिनीवरील कुंकू,टिकली आणि टँटू मधील रमा अर्थात अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे,लागिर झाल जी मधील के.के.अमित कुलकर्णी प्रमुख आकर्षक आहे.ता.20 नोव्हेंबरला येथील एसआरव्हीएम हायस्कूल मध्ये दांडीया स्पर्धा होणार आहेत.त्यात कपल,ग्रप दांडीया स्पर्धा होतील.या दिवशी अमित कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. ता.21 ऑक्टोबरला अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दिवशी ऱ्हीदम स्पेशालिस्ट कलाकारांचा आर्केस्टाचे नियोजन केले आहे.विजेत्यांना आकर्षक बक्षिसे,स्पॉट गेम्स व फनी गेम्स होतील.
विजया बिज्जरगीं,गिता सांवत,अनुराधा संकपाळ,मिरा शिंदे,ज्योती घाडगे,अनिता शिंदे,निलम थोरात,भारती तेली,सरिता मालाणी,दत्ता कुलकर्णी,निता मालाणी,वर्षा राठोड,निशा गडीकर,रेखा माने यांनी संयोजक केले आहे.या कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे आवाहन मीनल सांवत यांनी केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here