जत,प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी जत येथील सुनील भीमराव वास्टर यांची निवड झाली.निवडीचेपत्र सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिले. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर,मकरंद देशपांडे,तात्या बिरजे,पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे,जिल्हा महिला अध्यक्ष डॉ.ममता तेली,सरचिटणीस सुरेंद्र चौगुले. शेखर इनामदार,भाजप जत तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, बाबा देसाई, वैभव शिंदे आदी उपस्थित होते. या निवडीनंतर सुनील वास्टर म्हणाले, तालुक्यात भाजप मोठा पक्ष बनत आहे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची ताकत तळागाळात पोहोचविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची यशस्वी चार वर्षात त्यांनी केलेली विकासाची कामे गाव गाड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसेच संपूर्ण जत तालुक्यातील गावागावात युवा मोर्चाच्या शाखा काढून सर्व तरुणांना एकत्रित करून भाजपाची ताकद वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहील अशी ग्वाही दिली.
भाजप युवा मोर्चाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील वास्टर यांना निवडीचे पत्र देताना जि.प.अध़्यक्ष पृथ्वीराज देशमुख व मान्यवर





