सांगली | भ्रष्टअधिकारी व कर्मचारी यांच्या कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालायसमोर लक्षवेध आंदोलन |

0
3

सांगली : जत तालुक्यातील मौजे निगड़ी खुर्द येथील महात्मा फुले व भूमी जलसंधारण योजनेतील भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी यांचेवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्याच्या विरोधात  महाराष्ट्र कृषी दिनी शासनाचे लक्ष वेधन्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर सामाजिक कार्यकर्ते विक्रमभैय्या ढोणे यांनी लक्षवेध आंदोलन केले.
जत तालुक्यातील निगड़ी खुर्द येथील महात्मा फुले व जलसंधारण योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला होता. सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी गेल्या वर्षापासून पाठपुरावा केल्यानंतर कृषीआयुक्तलय , पुणे यांचेकडून संबधित भ्रष्टाचाऱ्यांकडून रक्कम वसूल करणे सह त्यांच्यावर फौजदारी कारवाई ठेवण्याचे आदेश विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर यांना दिले होते. त्यानुसार फक्त काम न करता काढलेली रक्कम ठेकेदारकडून शासन खाती जमा केली आहे.परंतु भ्रष्टाचाऱ्यांवर कोणतीही करवाई केली नसल्याने भविष्यात असे भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दोषी असणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर करवाई व्हावी यासाठी शासनाचे लक्ष वेधन्यासाठी कृषि दिनी जिल्हाधिकारी कार्यालायसमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास कांग्रेसचे युवक नेते सुजय शिंदे,युवक नेते गौतम ऐवळे,शेतकरी संघटनेचे महेश खराडे,भाकपचे सुदर्शन घेरडे,हणमंत कोळी,सुनिल शेजाळ,तुकाराम कळ्ळी,अनिल गडदे,क्रिष्णा गडदे,संदिप ओलेकर शहाजी माने,प्रतिक पाटील,राकेश दड्डाण्णवर,भारत खांडेकर देवकाते आदि उपस्थित होते.

सांगली : भ्रष्टअधिकारी व कर्मचारी यांच्या कारवाईसाठी व्हावी यासाठी जतचे सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालायसमोर लक्षवेध आंदोलन केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here