डफळापूर, वार्ताहर: येथील विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूल व छत्रपती विद्यालयाचे आजपासून नव्या इमारतीत स्थंलातर होत आहे. जतचे आमदार विलासराव जगताप, शिक्षण सभापती तम्माणगोंडा रवीपाटील, पंचायत समितीच्या सभापती मंगलताई जमदाडे, माजी सभापती प्रकाशरावजी जमदाडे, मन्सूर खतीब, संरपच बालिका चव्हाण, उपसंरपच प्रतापराव चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत हा स्थंलातर सोहळा संपन्न होणार आहे. परिसरातील पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन परशूराम चव्हाण सर यांनी केले आहे.
डफळापूर येथे दोन वर्षापुर्वी सुरू झालेल्या विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूलने आपल्या शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.नर्सरी,एलकेजी,युकेजी,पहिली





